1.कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
सीमेवर लढायला जाणाऱ्या वीर जवानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हातात धन नाही, शरीरात रक्त नाही, काय करावे तेही कळत नाही अशावेळी आपल्या कष्टाचेही सामर्थ्य अपुरे पडते असे कवयित्रीला वाटते.
2.सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
डोक्यावरून तोफगोळ्यांचा, बंदुकीतल्या गोळ्यांचा वर्षाव, पुढ्यात उसळणारे धुराचे लोट, धडाडणाऱ्या तोफा अशा परिस्थितीतही न डगमगता सैनिक पुढे पुढे जातच राहतो, म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.
3.डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?
सैनिकाची विजयी घोडदौड डोळे भरून पाहावी, असे कवयित्रीला वाटते.
1.सैनिकाचे औक्षण केले जाते _________
2.कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे _______
Q3.खालील ओळींचे रसग्रहण करा.
1.‘अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.’
‘औक्षण’ म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांतर्फे केले जाणारे हे एक औक्षण आहे. त्या क्षणी मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावना कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत व्यक्त केल्या आहेत.
प्रस्तुत ओळींमध्ये कवयित्रीने डोळ्यांना निरांजनाची, तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची उपमा देऊन सैनिकाच्या रक्षणासाठी देशवासियांच्या असंख्य डोळ्यांतील असंख्य ज्योती त्याचे जणू औक्षण करत आहेत, अशी कल्पना येथे केलेली आहे. येथे पराक्रमी सैनिकाला सर्वार्थाने अक्षम, असमर्थ अशा सर्वसामान्यांकडून केले जाणारे हे औक्षण आहे, अशी भावना यात व्यक्त केली आहे. द्रव्यहीन, सामर्थ्यहीन असूनही सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सर्वसामान्यांचे नेमके या ओळींतून वर्णन केले आहे.
2.‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच देशातील सर्वसामान्य जनता निर्धास्त जगू शकते, आपले रोजचे काम करू शकते, मुक्तपणे वावरू शकते. ते सीमेवर थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता, डोळ्यांत तेल घालून कार्यरत असतात, त्यामुळेच आपण सुख-समाधानाने, शांतपणे आपले आयुष्य जगू शकतो. ते आपले घरदार, कुटुंब सोडून देशाकरता प्राण देण्यास तयार असतात, त्यामुळे आपली घरेदारे, शेतीभाती, आपले परिवार सुरक्षित असतात.
म्हणूनच, या सैनिकांच्या सर्वोच्च त्यागाबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात कृतज्ञतेची भावना असते. ही कृतज्ञतेची भावना ’सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो“ या विधानातून व्यक्त होते.
3.कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘औक्षण’ या कवितेत लढाईसाठी रणभूमीवर जाणाऱ्या सैनिकाला ओवाळताना मनात दाटून येणाऱ्या भावभावनांचे उत्कट चित्रण केले आहे. कवितेत ‘दीनदुबळे’ हा शब्द सर्वसामान्य देशवासियांसाठी वापरला आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकाकडे सैनिकांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी पुरेसे धन, शक्ती किंवा कष्टाचे सामर्थ्य नसते. या सैनिकावरून स्वत:चा जीव ओवाळून टाकायचे म्हटले तरी हा सामान्य जीव त्याच्या कर्तृत्वापुढे कमीच पडतो.
अगदी कठीण परिस्थितीतही-तोफगोळ्यांच्या, बंदुकीच्या गोळ्यांच्या वर्षावातही जिद्दीने पुढे पुढे जातच राहणाऱ्या या पराक्रमी वीर योद्ध्याच्या तुलनेत सर्व देशवासीय जनता दीनदुबळी आहे. सैनिकांचा अभिमान बाळगणाऱ्या, त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची मनोमन इच्छा धरणाऱ्या; पण निर्धन, सामर्थ्यहीन असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना उद्देशून कवितेत ‘दीनदुबळे’ हा शब्द वापरला आहे.
4.‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हांला काय करावेसे वाटते ते लिहा.
सीमेवर लढण्यासाठी जाणारा सैनिक ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेने देशसेवा करत असतो. कोणत्याही संकटाची पर्वा न करता, प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतो. अशा सैनिकांची प्रत्यक्षपणे मी काही मदत करू शकत नसलो तरीही माझ्या परिने जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन.
माझ्या मते, आपण प्रत्येकाने थोडेसे डोळसपणे पाहिल्यास, खबरदारी बाळगल्यास, देशाच्या संरक्षणाची थोडीशी जबाबदारी उचलल्यास सैनिकांवरील भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. देशाचे रक्षण ही आपली जबाबदारी असल्याची भावना मनात रुजणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना आपलेपणा वाटावा याकरता रक्षाबंधन, दिवाळी अशा सणांच्या वेळी राखी, फराळ, भेटवस्तू पाठवून त्यांच्याप्रतीच्या भावना, आदर व्यक्त करता येईल. सैनिकांकरता, त्यांच्या कुटुंबांकरता गोळा केल्या जाणाऱ्या फण्डसमध्ये शक्य तेवढी मदत करता येईल. अशारीतीने आपल्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या देशसेवा करणाऱ्या सैनिकांना थोडीशी मदत निश्चितपणे करता येईल.
COMPLETED
Q1.तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखाद्या घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वत:हून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे, तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.
Q2.पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणाऱ्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये, म्हणून तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो; मात्र कोणीही त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही. त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्याने सूर्याचे कार्य जमेल तितके करण्याची जबाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पृथ्वीला देऊ शकत नाही याची तिला पूर्णपणे कल्पना आहे. तरीही ती आपल्या प्रकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शवते. सूर्याला मदत करण्याची उदात्त भावना या पणतीमध्ये दिसून येते. एखादे कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा व दृढ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूमध्ये आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनवण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे, हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून येथे व्यक्त झालेला आहे
Q3.सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा.
सूर्य अस्ताला जाऊ लागला, की कवीमन कविता करू लागते, तर चित्रकाराचा कुंचला अलगद रंगांची उधळण करू लागतो. सूर्यास्ताच्या वेळेचे निसर्गाचे ते रमणीय दृश्य पाहताना मन विचारांनी, आठवणींनी भरून येते. सूर्यास्तासमयी आकाशात दिसणारे रंग डोळ्यांना सुखावणारे असतात.
सूर्योदय – सूर्यास्त जणू मनुष्याच्या जन्म-मृत्यूचे प्रतीक आहेत. मनुष्याचा जन्म म्हणजे सूर्योदय, ऐन तारुण्याचा काळ म्हणजे दिवस आणि म्हातारपण (वार्धक्य) म्हणजे जणू आयुष्याची संध्याकाळ होय. सूर्यास्ताची वेळ मनाला शांतता व समाधानाचा अनुभव देत असते. असा अनुभव माणसाला त्याच्या उतारवयात येत असतो. ऐन तारुण्याचा, उमेदीचा काळ चांगल्या मार्गाने जगल्यास आयुष्याचा शेवटही शांत, समाधानकारक होतो, हेच जणू हा सूर्यास्त आपल्याला सांगत असतो.
दिवसभर कष्ट करणार्या कष्टकऱ्यांसाठी सूर्यास्त विश्रांती घेऊन येतो. आजचा दिवस संपल्याची जाणीव करून देणारा हा क्षण मनात नव्या दिवसाची ओढही जागवतो. गेलेला दिवस भूतकाळात जमा होणार असतो व येणारा दिवस उज्ज्वल भविष्यकाळ घेऊन येत असतो. काहीवेळा अपूर्ण राहिलेले पूर्ण करण्याची आशा मनात निर्माण करून, तर काही वेळा पूर्ण केलेल्या कामांचे समाधान चेहऱ्यावर उमटवून सूर्यास्त आपले विविध रंग आकाशात उधळत असतो. देवळात होणारा घंटानाद, आरतीचे सूर, देव्हाऱ्यातील दिव्याचा मंद प्रकाश सूर्यास्ताचे साैंदर्य वाढवतात. सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येकाच्या मनात असलेल्या श्रद्धास्थानाप्रती हात जोडले जातात.
Q4.कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गातील प्रकाशमान सूर्य आणि मिणमिणता प्रकाश देणारी पणती यांच्या माध्यमातून सजीवसृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये जगाला सुंदर करण्याची क्षमता असते, असा संदेश दिला आहे.
सूर्यास्तानंतर ही संपूर्ण पृथ्वी अंधकारमय होणार आहे. विश्वाच्या काळजीने सूर्य सर्वांना विनंती करतो, की पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा; पण त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही कारण सूर्यासमान क्षमता, सामर्थ्य आपल्यात नाही असे सर्वांना वाटते. अशावेळी पणती पुढे येते, मोठ्या नम्रतेने ती पृथ्वीला सांभाळण्याची जबाबदारी उचलते. भले ती सूर्याइतका प्रकाश पृथ्वीला देऊ शकणार नाही; मात्र पृथ्वीला अंधकारमय होऊ देणार नाही अशी जिद्द मनात ती बाळगते. तिची आंतरिक इच्छाशक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या आधारेच ती मोठी जबाबदारी उचलते. सूर्यालाही पणतीवर विश्वास आहे. पणतीचे धैर्य अन् नम्र भाव सूर्याला चिंतामुक्त करतो.
आपल्याही आसपास अशा सामर्थ्यशाली व्यक्ती असतात, ज्यांना मदतीची गरज असते. त्यावेळी आपण आपल्या परीने शक्य ती मदत त्यांना करावी. एखाद्या कार्यात आपला खारीचा का होईना, वाटा उचलावा. प्रत्येकामध्ये क्षमता असते; केवळ आपल्यातील क्षमतेला योग्य कार्यात वापरण्याचे ज्ञान, विश्वास व सकारात्मकता आपल्यात असली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आत लपलेल्या गुणांना जाणून घेणार नाही तोपर्यंत ते कधीच इतरांसमोर येणार नाहीत. या सुप्तगुणांना वाट मोकळी करून द्यावी, कोणालाही कमी लेखू नये कारण या जीवसृष्टीत प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे अन् प्रत्येक वस्तू आपल्या क्षमतेनुसार जग सुंदर करत असते, असा अर्थ या प्रतीकांतून व्यक्त होतो.
Q5.सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
सूर्य: | (उदास) अहो, कोणी ऐकतंय का? माझी अस्ताची वेळ झाली आहे. मी अस्ताला गेल्यानंतर या धरतीचे कसे होईल? कोणी येईल का माझ्या मदतीला? या पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा हो! |
पणती: | हे महान सूर्या! मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. |
सूर्य: | बोल… पणती! |
पणती: | (नम्रतेने) मी तुझी चिंता दूर करू इच्छिते. मला माहीत आहे, मी तुझ्याइतकी सामर्थ्यवान नाही; पण मला जमेल तसा पृथ्वीवरील अंधकार दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. |
सूर्य: | (आनंदाने) खरंच पणती, तू वाचवशील या पृथ्वीला? तू करशील मला मदत? |
पणती: | हो! आनंदाने. |
सूर्य: | तू लहान आहेस; परंतु तुझी जिद्द मोठी आहे. तुझे हे बोल ऐकून माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला आहे. |
पणती: | सूर्यदेवा, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी नक्कीच तुझा विश्वास सार्थ ठरवेन. |
सूर्य: | माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच या धरतीला प्रकाशित करशील. आता मी निश्चिंत मनाने अस्ताला जातो. |
पणती: | धन्यवाद भास्करा! तू मला माझी क्षमता दाखवण्याची संधी दिलीस. |
COMPLETED
Q1.खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
१ | २ | ३ | ४ | ५ |
लेखकाची माध्यमिक शाळा | लेखकाला घडवणारे शिक्षक | लेखकाचे जन्मगाव | ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती | मुंबईतील घराचे नाव |
१ | २ | ३ | ४ | ५ |
लेखकाची माध्यमिक शाळा | लेखकाला घडवणारे शिक्षक | लेखकाचे जन्मगाव | ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती | मुंबईतील घराचे नाव |
गिरगावातील युनियन हायस्कुल | भावे सर, जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला | दक्षिण गोव्यातील माशेल | लेखकाची आई व मामा | मालती निवास |
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये-
१. सेवाभावी वृत्ती.
२. स्वत:ला झोकून देत शिकवणे.
३. निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे.
लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्त्व विशेष-
१. दारिद्रयाशी संघर्ष करणारी
२. धीर न सोडणारी व न खचणारी
३. कष्टाळू
४. शिक्षणाचं महत्त्व जाणणारी
1.लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ___________
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण लेखकाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे लेखकाच्या अभ्यासाचा व जीवनाचा पाया पक्का झाला.
2.लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ____________
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण तेथे तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळू शकत होते व लेखकाची आई तेवढी शिकलेली नव्हती.
3.लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण _____________
लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण हायस्कूलच्या प्रवेश फीची रक्कम जमा होईपर्यंत नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले होते.
Q4.कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
1.आपण सगळ्यांनी ______ मदत केली पाहिजे. (आई)
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.
2.आमच्या बाईंनी प्रमुख ______ आभार मानले. (पाहुणे)
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
3.शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी _____ रुजू झाला. (नोकरी)
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.
Q5. ‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
१. अलंकार: उपमा अलंकार
२. उपमेय: पुसटशा आठवणी
३. उपमान: वाऱ्याच्या लहरी
Q6.(1)‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
भावे सरांनी लेखकाला म्हणजेच डॉ. माशेलकरांना आयुष्याचे खरे तत्त्वज्ञान शिकवले. विज्ञानाच्या एका लहानशा प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगाच्या साहाय्याने एकवटून कागद सहजरीत्या जाळता येतो. त्याचप्रमाणे एकाग्रतेच्या जोरावर लक्ष केंद्रित करून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते असे त्यांनी सांगितले. आपण एकाग्रता साधली, तर सर्व संकटांवर मात करत यश मिळवू शकतो, हे भावे सरांनी माशेलकरांना त्या प्रयोगातून पटवून दिलं. या त्यांच्या शब्दांतून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला. आयुष्यभरासाठी प्रेरणा, ताकद मिळाली.
(2)शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांच्यामध्ये विविध गुणांचे दर्शन होते. माशेलकरांनी त्यांच्या आईची मेहनत, मामाचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवून त्यांच्या या उपकारांचे स्मरण ठेवले आहे. यातून त्यांच्यातील कृतज्ञता हा गुण दिसून येतो. युनियन हायस्कूलमधील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते या लेखकाच्या वाक्यातून त्यांची सुजाणता कळून येते. अभ्यासाकरता अपुरी जागा, पूरक वातावरणाचा अभाव असूनही लेखकाने जिद्दीने अभ्यास करत यश मिळवलं. यातून त्यांची जिद्द आणि कष्टाळूपणा अधोरेखित होतो. भावे सरांनी दिलेला एकाग्रतेचा मंत्र अनुसरत लेखकाने आयुष्याची उभारणी केली. यावरून त्यांचा आज्ञापालन हा गुण ठळकपणे जाणवतो. विद्यार्थिदशेतील डॉ. माशेलकरांमध्ये कृतज्ञता, सुजाणता, जिद्द, कष्टाळूपणा व आज्ञापालन हे गुण दिसून येतात.
(3)डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.
डॉ. माशेलकरांच्या आईने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे, आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता ती सतत कष्ट करत होती. घरची परिस्थिती इतकी बेताची होती, की प्रसंगी तीन पैसे उभे करतानाही तिच्या डोळ्यांत पाणी उभे राही, हे आठवून लेखकाच्या अंगावर काटा उभा राहतो. तिने लेखकासाठी घेतलेले कष्ट लेखकाला शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. शाळेचे दिवस आठवले, की त्यांची आई त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. आई केवळ त्यांची शिक्षकच नव्हे, तर सर्वस्व असल्याचे ते मान्य करतात. तिच्याविषयीचे ऋण व्यक्त करता येण्यासारखं नाही, असे ते म्हणतात. या लेखकाने केलेल्या वर्णनातून त्यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते.
(4)’माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडाक्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे.
completed
SOLUTION
रेखामावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये:
पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये-
१. गोजिरी
२. गुलाबी तळवे
३. लोण्यासारखी
Q2.कारणे लिहा.
(a)स्नेहल त्रासली, कारण __________.
स्नेहल त्रासली, कारण रेखामावशी हॉलमधील लादी पुसत असताना त्यांच्या पावलांचे काळे मळकट ठसे पुसलेल्या लादीवर उमटत होते व स्वच्छतेची आवड असलेल्या स्नेहलला ते आवडले नाही.
(b)पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण सुमितच्या ॲपने त्यांच्या पावलांचे ‘डर्टीएस्ट फूटप्रिन्ट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्ट्स’ असे वर्णन करत काळीकुट्ट पावले दाखवली.
(c)रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण _________
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.
(d)अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण __________
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे नुकसान टळेल व ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टळेल.
Q3.उत्तरे लिहा.
(a)स्नेहलने केलेला निश्चय-
स्नेहलने केलेला निश्चय- कॉलेजात ये-जा करण्यासाठी सायकल वापरण्याचा.
(b)अभिषेकने केलेला निश्चय-
अभिषेकने केलेला निश्चय- कॉलेजला बसने ये-जा करण्याचा.
Q4.पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | अभिषेक | सुमित | स्नेहल | पावडेकाका | रेखामावशी |
स्वभाव | |||||
वैशिष्ट्ये |
व्यक्ती | अभिषेक | सुमित | स्नेहल | पावडेकाका | रेखामावशी |
स्वभाव | इतरांसोबत मिसळणारा | पर्यावरणाबाबत तळमळ असणारा | स्वच्छतेची आवड असणारी | रागीट स्वभाव असणारे | वागण्यात साधेपणा असणारा |
वैशिष्ट्ये | चांगल्या गोष्टी झटकन आचरणात आणणारा | आपले म्हणणे व्यवस्थित पटवून देणारा | स्पष्टवक्ती | सहजासहजी राजी न होणारे | मेहनती |
– | टेक्नोलॉजीची आवड असणारा | इतरांची मानणे जिंकणारी | अहंकारी | – |
Q5.खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
(a)रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे- उपमा अहंकार
(b)पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.
पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा- उपमा अलंकार
Q6.खालील शब्दाचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा.
(a)व्हर्च्युअल रिॲलिटी
व्हर्च्युअल रिॲलिटी- शाब्दिक (वरवरचे) सत्य
(b)टेक्नोसॅव्ही–
टेक्नोसॅव्ही- तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले
Q7.खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.
‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’
विरामचिन्हे | नावे |
” “ | दुहेरी अवतरणचिन्ह |
, | स्वल्पविराम |
? | प्रश्नचिन्ह |
Q8.खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.
(a)स्नेहल-
स्नेहल- विशेषनाम
(b)तिचे-
तिचे- सर्वनाम
(c)चंदेरी-
SOLUTION
चंदेरी- विशेषण
(d)करणे-
करणे- क्रियापद
Q9.खालील तक्ता पूर्ण करा.
एकवचन | शहर | नदी | पाऊल | डोंगर |
अनेकवचन |
एकवचन | शहर | नदी | पाऊल | डोंगर |
अनेकवचन | शहरे | नद्या | पावलं | डोंगर |
Q10.(1)’आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
रोजच्या जीवनात अगदी कळत नकळतपणे आपल्या हातून प्रदूषण होत असते. या प्रदूषणाची आपल्याला जराही जाणीव नसते; मात्र त्याचे गंभीर परिणाम वातावरणावर होत असतात. जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), पाऊस पुरेसा व वेळेवर न पडणे, आम्लपर्जन्य इत्यादी अनेक स्वरूपात ही पावले वातावरणावर उमटलेली दिसतात. आपल्या एखाद्या चुकीमुळे क्षणात प्रदूषण होते; पण ते प्रदूषण वातावरणातून नष्ट करण्याकरता कित्येक वर्षांचा काळ लागतो. प्लास्टिकचा अतिवापर, गाड्यांमधून, कारखान्यांतून बाहेर पडणारे विषारी धूर, सांडपाणी यांमुळे होणारे प्रदूषण अनेक झाडे लावल्यानंतरही लगेच नष्ट होत नाही. आपल्या मळलेल्या पावलांचे ठसे कापडाने लगेच पुसता येतात; मात्र हे प्रदूषणरूपी ठसे ताबडतोब पुसले जात नाहीत.
Q10.(2)‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.
‘थेंबे-थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या प्रदूषणाचा आता भस्मासूर झाला आहे. यामुळे, ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमत: थांबवली पाहिजे. विषारी धूर, रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर नियम लावले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. याव्यतिरिक्त, वातानुकूलित यंत्र (एसी), शीतकपाट (फ्रीज), परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. अशाप्रकारे, आपण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकाने किमान एक झाड लावून, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. तरच ही भयानक परिस्थिती टाळता येईल.
COMPLETED