medium | Aster Classes

Q1.खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.

अब्दुलरघुभैया
  
  

SOLUTION

अब्दुलरघुभैया
इतरांच्या आनंदात आनंद मानणारास्वत:च्या कुटुंबाला महत्त्व देणारा
व्यवसायातील फायद्याचा विचार न करता समाजसेवा करणारास्वत:च्या धंद्यात फायदा कमवणारा
मानवसेवा करणारा असामान्य माणूसचारचौघांसारखा सामान्य माणूस

खालील विधानांमागील कारणे लिहा.

Q2.(A)रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.

SOLUTION

अब्दुल तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असल्याचे लोकांना समजले, तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या धंद्यावर होईल, असे शन्नूला वाटले.

(B)आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.

SOLUTION

संक्रांतीच्या दिवशी तपोवनातील मुली व स्त्रियांच्या हातात बांगड्या भरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अब्दुलला अनमोल आनंद मिळत असे. अब्दुलला ही दुर्मीळ संधी वाटत असे.


Q3.(A)गुणविशेष लिहा.

SOLUTION

दाजीसाहेब- 

 1. तपस्वी समाजसेवक
 2. वयोवृद्ध असूनही तडफदार
 3. नि:स्वार्थी व त्यागी
 4. माणुसकी जपणारे
 5. समाजऋण मानणारे

(B)गुणविशेष लिहा.

SOLUTION

शन्नोची स्वभाववैशिष्ट्ये-

 1. कर्तव्यदक्ष गृहिणी
 2. सर्वसामान्य विचार करणारी
 3. गरिबीला त्रासलेली
 4. मुलावर प्रेम करणारी
 5. प्रगतीची आस असलेली

Q4.खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.

वाक्येअव्ययेप्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.  
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.  
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.  
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.  

SOLUTION

वाक्येअव्ययेप्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.जवळशब्दयोगी
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.आणिउभयान्वयी
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.बाप रे!केवलप्रयोगी
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.भरभरक्रियाविशेषण

Q5.विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

(A)‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’

SOLUTION

 • ” ” – दुहेरी अवतरणचिन्ह
 • , – स्वल्पविराम्
 • . – पूर्णविराम

(B)’अन्वर जेवला?“

SOLUTION

 • ” ” – दुहेरी अवतरणचिन्ह
 • ? – प्रश्नचिन्ह

Q6.खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.

 • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
 • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)

SOLUTION

Do it yourself.

Q7.(A)सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’

SOLUTION

अब्दुल हा बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणारा एक सर्वसामान्य माणूस; पण दाजीसाहेबांच्या तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांना वर्षातून दोनदा बांगड्या भरण्यासाठी तो स्वत:हून तयार झाला. दरवर्षी न चुकता, न बोलावता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो त्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. कुष्ठरोगी भगिनींच्या जीवनात आनंद, उत्साह निर्माण करत असे. ‘कुष्ठरोग’ हा तसा सर्वसामान्यांच्या दृष्टीने नावडता विषय. त्यातही अशा स्त्रियांच्या हातात बांगड्या भरणे हे अवघड कार्य; पण अब्दुलने हेही सहज केले. पत्नीची बोलणी सहन करत, ऐन सणांदिवशी आपले चुडीचे दुकान बंद ठेवून, स्वत:च्या फायद्याचा जराही विचार न करता तो तपोवनात जात असे व मनापासून आपले काम करत असे. मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या लेकीबाळींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यात त्याला खूप समाधान मिळत असे. सत्कार समारंभाचे निमंत्रण ऐकून त्याला आनंद झाला; पण तपोवनासाठी मी काही सत्कार करण्याएवढे कार्य केले नाही असे वाटण्याइतकी साधी, नम्र वृत्ती त्याच्याजवळ होती, म्हणून अब्दुल एक थोर समाजसेवक आहे, असे मला वाटते.

(B)शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.

SOLUTION

अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. इतरांप्रमाणेच आपल्या पतीनेही चांगला धंदा करावा, खूप पैसे कमवावेत, म्हणजे घर व्यवस्थित चालेल असा तिचा विचार आहे. शिवाय, ऐन सणांदिवशी, ज्यावेळी कितीतरी बायका दुकानात बांगड्या भरायला येतात त्यावेळी अब्दुल आपले दुकान बंद ठेवून तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जातो, हे तिला पटत नाही कारण, त्यामुळे चांगले पैसे कमावण्याची संधी अब्दुल गमावून बसतो. परिणामी, पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या मुलाचा साधा हट्टही पुरवता येत नाही, जमा-खर्च बसवताना ओढाताण होते, असे तिला वाटत असावे. या सर्वांचा परिणाम म्हणून अब्दुलला शन्नूची बोलणी ऐकावी लागतात; पण तिच्या अशा वागण्यामागे कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून ‘आपल्या कुटुंबाचा विचार’ महत्त्वाचा आहे, असे दिसते.

(C)तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

SOLUTION

तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय नक्कीच वाढवू शकेल. त्यासाठी त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध समाजमाध्यमांवर बांगड्यांच्या जाहिराती टाकून तो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्या जाहिरातींसोबतच आपला व्यवसाय ‘डिजिटल’ पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्यासाठी तो स्वत:चे ‘ॲप’ विकसित करू शकतो. त्या ॲपवर तऱ्हेतऱ्हेच्या बांगड्यांचे नमुने पेश करून, आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. शिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सुरू करून तो देशातच नाही, तर परदेशातूनही मागणी मिळवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.

शिवाय, बांगड्या बनवण्यासाठीची नवीन यंत्रसामग्री विकत घेऊन तो विविध प्रकारच्या (लाखेच्या, काचेच्या, प्लास्स्टिकच्या), विविध रंगांच्या, आकाराच्या बांगड्या बनवू शकतो व आपला व्यवसाय वाढवू शकतो.

(D)दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.

SOLUTION

सहावीत असतानाची गोष्ट. परीक्षा जवळ आलेली असताना माझा मित्र अचानकच आजारी पडला. परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता. त्याची अडचण लक्षात येताच मी माझ्यापरीने त्याला जमेल ती मदत करू लागलो. 

अवघड गणिते, इतर विषयांचे परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उजळणी करून घेतली. परीक्षेच्या काळात आम्ही एकत्र अभ्यास करायचो. परीक्षा संपल्यावर त्याने माझा हात हातात घेतला व आभार मानले. ओलावलेल्या नेत्रांनी त्याने मला प्रेमभराने मिठी मारली. हा आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

COMPLETED

VISITORS COUNT

380095
Users Today : 236
Total Users : 380094
Views Today : 613
Total views : 1325813

Browse Categories

Archives