Marathi | Aster Classes

marathi, first seven chapters, with complete solutions, Maharashtra board, ssc, English medium,

Chapter 1.

Chapter 2.

Chapter 3. 

Chapter 4.

Chapter 5.

Chapter 6.

Chapter 7.


Q1.खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.

अब्दुलरघुभैया
  
  

SOLUTION

अब्दुलरघुभैया
इतरांच्या आनंदात आनंद मानणारास्वत:च्या कुटुंबाला महत्त्व देणारा
व्यवसायातील फायद्याचा विचार न करता समाजसेवा करणारास्वत:च्या धंद्यात फायदा कमवणारा
मानवसेवा करणारा असामान्य माणूसचारचौघांसारखा सामान्य माणूस

खालील विधानांमागील कारणे लिहा.

Q2.(A)रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून.

SOLUTION

अब्दुल तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असल्याचे लोकांना समजले, तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या धंद्यावर होईल, असे शन्नूला वाटले.

(B)आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.

SOLUTION

संक्रांतीच्या दिवशी तपोवनातील मुली व स्त्रियांच्या हातात बांगड्या भरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अब्दुलला अनमोल आनंद मिळत असे. अब्दुलला ही दुर्मीळ संधी वाटत असे.


Q3.(A)गुणविशेष लिहा.

SOLUTION

दाजीसाहेब- 

 1. तपस्वी समाजसेवक
 2. वयोवृद्ध असूनही तडफदार
 3. नि:स्वार्थी व त्यागी
 4. माणुसकी जपणारे
 5. समाजऋण मानणारे

(B)गुणविशेष लिहा.

SOLUTION

शन्नोची स्वभाववैशिष्ट्ये-

 1. कर्तव्यदक्ष गृहिणी
 2. सर्वसामान्य विचार करणारी
 3. गरिबीला त्रासलेली
 4. मुलावर प्रेम करणारी
 5. प्रगतीची आस असलेली

Q4.खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.

वाक्येअव्ययेप्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.  
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.  
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.  
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.  

SOLUTION

वाक्येअव्ययेप्रकार
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.जवळशब्दयोगी
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.आणिउभयान्वयी
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.बाप रे!केवलप्रयोगी
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.भरभरक्रियाविशेषण

Q5.विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

(A)‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’

SOLUTION

 • ” ” – दुहेरी अवतरणचिन्ह
 • , – स्वल्पविराम्
 • . – पूर्णविराम

(B)’अन्वर जेवला?“

SOLUTION

 • ” ” – दुहेरी अवतरणचिन्ह
 • ? – प्रश्नचिन्ह

Q6.खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.

 • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
 • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)

SOLUTION

Do it yourself.

Q7.(A)सत्यता पटवून द्या- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’

SOLUTION

अब्दुल हा बांगड्या विकण्याचा व्यवसाय करणारा एक सर्वसामान्य माणूस; पण दाजीसाहेबांच्या तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांना वर्षातून दोनदा बांगड्या भरण्यासाठी तो स्वत:हून तयार झाला. दरवर्षी न चुकता, न बोलावता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो त्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. कुष्ठरोगी भगिनींच्या जीवनात आनंद, उत्साह निर्माण करत असे. ‘कुष्ठरोग’ हा तसा सर्वसामान्यांच्या दृष्टीने नावडता विषय. त्यातही अशा स्त्रियांच्या हातात बांगड्या भरणे हे अवघड कार्य; पण अब्दुलने हेही सहज केले. पत्नीची बोलणी सहन करत, ऐन सणांदिवशी आपले चुडीचे दुकान बंद ठेवून, स्वत:च्या फायद्याचा जराही विचार न करता तो तपोवनात जात असे व मनापासून आपले काम करत असे. मनपसंत बांगड्या भरल्यानंतर या लेकीबाळींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहण्यात त्याला खूप समाधान मिळत असे. सत्कार समारंभाचे निमंत्रण ऐकून त्याला आनंद झाला; पण तपोवनासाठी मी काही सत्कार करण्याएवढे कार्य केले नाही असे वाटण्याइतकी साधी, नम्र वृत्ती त्याच्याजवळ होती, म्हणून अब्दुल एक थोर समाजसेवक आहे, असे मला वाटते.

(B)शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.

SOLUTION

अब्दुलची बायको शन्नू ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे. इतरांप्रमाणेच आपल्या पतीनेही चांगला धंदा करावा, खूप पैसे कमवावेत, म्हणजे घर व्यवस्थित चालेल असा तिचा विचार आहे. शिवाय, ऐन सणांदिवशी, ज्यावेळी कितीतरी बायका दुकानात बांगड्या भरायला येतात त्यावेळी अब्दुल आपले दुकान बंद ठेवून तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जातो, हे तिला पटत नाही कारण, त्यामुळे चांगले पैसे कमावण्याची संधी अब्दुल गमावून बसतो. परिणामी, पुरेसे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या मुलाचा साधा हट्टही पुरवता येत नाही, जमा-खर्च बसवताना ओढाताण होते, असे तिला वाटत असावे. या सर्वांचा परिणाम म्हणून अब्दुलला शन्नूची बोलणी ऐकावी लागतात; पण तिच्या अशा वागण्यामागे कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून ‘आपल्या कुटुंबाचा विचार’ महत्त्वाचा आहे, असे दिसते.

(C)तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

SOLUTION

तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय नक्कीच वाढवू शकेल. त्यासाठी त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध समाजमाध्यमांवर बांगड्यांच्या जाहिराती टाकून तो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्या जाहिरातींसोबतच आपला व्यवसाय ‘डिजिटल’ पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्यासाठी तो स्वत:चे ‘ॲप’ विकसित करू शकतो. त्या ॲपवर तऱ्हेतऱ्हेच्या बांगड्यांचे नमुने पेश करून, आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. शिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सुरू करून तो देशातच नाही, तर परदेशातूनही मागणी मिळवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.

शिवाय, बांगड्या बनवण्यासाठीची नवीन यंत्रसामग्री विकत घेऊन तो विविध प्रकारच्या (लाखेच्या, काचेच्या, प्लास्स्टिकच्या), विविध रंगांच्या, आकाराच्या बांगड्या बनवू शकतो व आपला व्यवसाय वाढवू शकतो.

(D)दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.

SOLUTION

सहावीत असतानाची गोष्ट. परीक्षा जवळ आलेली असताना माझा मित्र अचानकच आजारी पडला. परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता. त्याची अडचण लक्षात येताच मी माझ्यापरीने त्याला जमेल ती मदत करू लागलो. 

अवघड गणिते, इतर विषयांचे परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न केला. त्याची उजळणी करून घेतली. परीक्षेच्या काळात आम्ही एकत्र अभ्यास करायचो. परीक्षा संपल्यावर त्याने माझा हात हातात घेतला व आभार मानले. ओलावलेल्या नेत्रांनी त्याने मला प्रेमभराने मिठी मारली. हा आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

COMPLETED

Q1.कृती पूर्ण करा.

(a)‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.

SOLUTION

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

(b)कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.

SOLUTION

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो.


Q2.एका शब्दांत उत्तर लिहा.

(a)कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट- 

SOLUTION

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट- कवीचे हात

(b)कवीचा जवळचा मित्र- 

SOLUTION

कवीचा जवळचा मित्र- अश्रू


Q3.खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(a)माना उंचावलेले हात

SOLUTION

कवीचे सर्वस्व असलेले हात नेहमी कष्ट उपसण्यात व्यस्त होते. याच हातांनी कधी त्यांना पोटापाण्यासाठी काम मिळवून दिले, तर कधी नवनिर्मिती करून मान-सन्मान मिळवून दिला.

(b)कलम केलेले हात

SOLUTION

कलम करणे म्हणजे छाटणे, घाव घालून तोडणे. प्रस्तुत शब्दसमूहातून कवीच्या हातांना नवनिर्मिती करण्यापासून रोखले गेले किंवा त्यांच्या नवनिर्मितीची, काव्यप्रतिभेची, सृजनशक्तीची कोंडी झाली, त्यांच्या हातांना उपेक्षा सहन करावी लागली असा अर्थ व्यक्त होतो.

(c)दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात

SOLUTION

कवीचे नवनिर्मितीक्षम, सृजनशील हात जे त्याच्यासाठी सर्वस्व आहेत, ते नवनिर्माणाची शक्ती, काव्यप्रतिभा असूनही रोजची भूक भागवण्यासाठी खस्ता खाण्यात, कष्ट उपसण्यातच व्यस्त होते.


Q4.खालील ओळींचे रसग्रहण करा.

(a)‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’

SOLUTION

‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते.

कष्टकऱ्याचे संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दु:ख, दारिद्र्याशी झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसादिवसांनी सरत गेले, तरीही त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते. असे तापदायक आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते.

(b)’दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

SOLUTION

‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते. नेहमी जगाच्या सुखाचा विचार करणारा हा कष्टकरी या जगातच रममाण होऊन जगतो. दारिद्र्याचे चटके सहन करत, सतत येणाऱ्या अडचणी, दु:खे पेलून, त्यावर मात करून तो आपले जीवन जगतच राहतो. हे सर्व सहन करण्याची, संकटांवर, दु:खावर मात करण्याची शिकवण जगाच्या शाळेत त्याला मिळते. त्यामुळे, तो कधीही दु:खाचा बाऊ करत नाही किंवा निराशेने खचून जात नाही. आपणही त्याच्याप्रमाणे जीवनात येणाऱ्या दु:खातून, अडचणींतून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी विचार वरील ओळींतून लक्षात येतो.

(c)कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

SOLUTION

कवी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्याना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात. हे कष्ट उपसण्याच्या नादात, त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याचा, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो.त्याला रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. गरिबी कायम सोबतीला असते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टमय जीवनाला अश्रूंची सोबत असते. दु:ख पचवण्याचे, त्यावर मात करून पुढे जात राहण्याचे बळ गोळा करावे लागते.

झोतभट्टीतील पोलाद ज्याप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडते त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नाना तऱ्हेच्या संकटांनी, दु:खांनी होरपळून निघत असते, तरीही हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो. या दु:खांत होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते. दु:खांचा, परिस्थितीचा बाऊ न करता, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो. अशाप्रकारे, कष्टाशी, दु:खांशी झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते.

(d)’कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

SOLUTION

नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करताना ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’, या शब्दांत कवीने भीषण जीवनसत्य मांडले आहे.

रोजची भूक भागवण्यासाठीही जिथे अपार कष्ट करावे लागतात, या पोटामागे संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते अशा कष्टकऱ्यांचे जीवन खूपदा सुखाची वाट पाहण्यात वाया जाते किंवा दु:खांशी झुंज देण्यात, अडचणींचा सामना करण्यातच निघून जाते. त्यांचे आयुष्य रणरणत्या उन्हाळ्याचे असते. पोटाची आग शांत करण्यासाठी त्यांना भाकरीच्या चंद्राची वाट पाहावी लागते, तिचा शोध घ्यावा लागतो. अशा कष्टकर्यांच्या जीवनातील व्यथा, वेदना मांडून कवीने जीवनसत्याचे दर्शन घडवले आहे. दु:खमय परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आयुष्य जगणाऱ्या कामगाराचे चित्रण यात घडते.

completed


Q1.टिपा लिहा.

(a)बार्क

SOLUTION

‘बार्क’ हे ‘भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजेच ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

(b)डॉ. होमी भाभा

SOLUTION

डॉ. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी ‘भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर’ या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. ‘आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे’ हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला.

Q2.’स्काय इस द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

SOLUTION

लेखक ‘भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर’च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना ’तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.“ असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की ‘स्काय इज द लिमिट’ अशी परिस्थिती निर्माण होते.

Q3.मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?

SOLUTION

मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली जात असे ते लोक कामाचे स्वरूप, त्यांमधील बारकावे हे काहीही न शिकता प्रथम आपल्या हाताखाली काम करण्यासाठी मदतनिसांची मागणी करत. काम सुरू होण्याआधीच साधनसामग्रीची मागणी केली जात असे. या वृत्तीमुळेच ते काम कधी झाले नाही. काम शिकून, समजून घेण्यात कोणालाच रस नसे. वरिष्ठांना ही गोष्ट न आवडल्याने या कामासाठी कोणाची नेमणूक झाली नाही. यामुळेच, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम झाले नसावे असे वाटते.

Q4.‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.

SOLUTION

परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या व्यक्ती ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीप्रमाणेच काम करत राहतात. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रातील प्रत्येक बारीकसारीक काम ते स्वतः शिकून घेतात. त्यातील बारकावे जाणून घेतात. ते काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लागणारा वेळ याबाबत त्यांना नेमकेपणाने माहिती असते. त्यामुळेच, ते आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. आपल्या वरिष्ठांना या कामातील सारे काही करता येते, हे माहीत असल्यामुळे हाताखालचे लोक त्यांना मान देतात. त्यांनी केलेल्या सूचनांचे योग्य प्रकारे पालन करतात. अशाप्रकारे ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट होते.

Q5.‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान स्वानुभवातून स्पष्ट करा.

SOLUTION

एखाद्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे आपल्याला त्या कामातील बारकावे लक्षात येतात. कामात एखादी चूक होत आहे हे लक्षात आल्यास ती दुरुस्त करता येते, हे मला प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. इयत्ता नववीत असताना आमच्या शाळेच्या वाङ्मय मंडळाने आमचे एक शिक्षक आणि आम्हां काही विद्यार्थ्यांवर शाळेच्या ग्रंथालयासाठी नवीन पुस्तके खरेदी करण्याची जबाबदारी सोपवली होती. आम्ही ग्रंथदानाच्या माध्यमातून लोकांकडून दान स्वरूपात पुस्तके मिळवली. प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्याशी इ-मेल, पत्रांद्वारे संपर्क साधून सवलतीच्या दरात पुस्तके देण्याची विनंती केली. झालेल्या खर्चाची व्यवस्थित नोंद ठेवली. पुस्तकांची खरेदी पूर्ण झाल्यावर सर्व पुस्तकांचे विषयांनुसार वर्गीकरण केले. संगणकाद्वारे त्यांची नोंदणी केली. अशाप्रकारे, या साऱ्या उपक्रमांतून आम्ही वेळेचे नियोजन, कामाचे व्यवस्थापन, हिशोब, पत्रलेखन अशा साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून शिकलो. या सर्व गोष्टी स्वत: करता करता शिकल्यामुळे अतिशय चांगल्या समजल्या व लक्षातही राहिल्या.

COMPLETED


Q1.उत्तरे लिहा.

1.पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख- 

SOLUTION

पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख- पुलकित

2.२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष- 

SOLUTION

२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष- लेखक रा. ग. जाधव

3.पाठात उल्लेख असणारी नदी- 

SOLUTION

पाठात उल्लेख असणारी नदी- कृष्णा

4.सभासंमेलने गाजवणारे कवी- 

SOLUTION

सभासंमेलने गाजवणारे कवी- कविवर्य नारायण सुर्वे

Q2.शालीचे शाल या पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

SOLUTION

शालीचे उपयोग-

 1. सन्मान करण्यासाठी
 2. शोभा वाढवण्यासाठी
 3. लहान मुलाला ऊब देण्यासाठी
 4. भिक्षेकऱ्याला पांघरण्यासाठी
 5. शाल विकून अन्नाची ऊब मिळवण्यासाठी

Q3.खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

1.एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

SOLUTION

लेखकाने हे दृश्य पाहून न राहावून स्वत:च्या सुटकेसमधील पु. लं. नी दिलेली शाल व त्यासोबत काही पैसे खिडकीतून त्या बाईला देऊ केले.

2.म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.

SOLUTION

लेखकाने दुसऱ्याच दिवशी त्या भिक्षेकऱ्यास दोन शाली दिल्या.

Q4.कारणे शोधून लिहा.

1.एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण___

SOLUTION

बॅगेत फक्त पडून राहिलेल्या शालीचा उपयोग थंडीने कुडकुडणाऱ्या एका गरजूला थंडीपासून वाचवण्यासाठी झाला होता.

2.शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण___

SOLUTION

नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते.

3.लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ______

SOLUTION

शाल हे सन्मानाचे प्रतीक आहे व सन्मान केल्यानंतर अनेक वेळा तो सन्मान मिळवणारी व्यक्ती अहंकारी बनते.

Q5.आकृती पूर्ण करा.

SOLUTION

 • विश्वकोशाचा अध्यक्ष
 • मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष

Q6.खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

1.बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.

SOLUTION

औदार्य, संवेदनशील मन, माणुसकी

2.खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!

SOLUTION

मनाचा सच्चेपणा, प्रगल्भता

3.हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.

SOLUTION

मनाचा मोठेपणा, दानशूरता

Q7.खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

1.जवळपास 

SOLUTION

जवळपास– जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ.

2.उलटतपासणी

SOLUTION

उलटतपासणी- उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात.

Q8.अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

1.नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.

SOLUTION

नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.

2.खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.

SOLUTION

खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या.

3.मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.

SOLUTION

मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले.

Q9.‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

SOLUTION

लेखकाने सुटकेमधील काढलेली शाल कशी होती?

Q10.शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘अवाळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

– ता– त्व– आळू– पणा
    

SOLUTION

– ता– त्व– आळू– पणा
भव्यताममत्वदयाळूशहाणपणा
दीनतालघुत्वकष्टाळूमोठेपणा
स्वच्छतादातृत्वझोपाळूचांगुलपणा
मित्रताकर्तव्यपायाळूखरेपणा
सहनशीलताप्रभुत्त्वकनवाळूसाधेपणा

Q11.अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.

1.लेखक सुंदर लेखन करतात.

SOLUTION

लेखिका सुंदर लेखन करते.

2.तो मुलगा गरिबांना मदत करतो.

SOLUTION

ती मुलगी गरिबांना मदत करते.


Q12.(1)‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

SOLUTION

शालीनता हा एक स्वभावगुण आहे, जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते; मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही. कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही. शाल पांघरून मनाची, आचरणातील शालीनता मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही; मात्र ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते. त्यामुळे, ‘शाल आणि शालीनता’ यांचा विशेष संबंध असेलच असे नाही.

(2)‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.

SOLUTION

माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरज भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा-पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक ही त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.

(3)लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.

SOLUTION

मी इयत्ता सहावीत असतानाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो, म्हणून आजी-आजोबांनी मला सायकल घेऊन दिली. मला खूपच आनंद झाला होता. आठ दिवसांतच मी सायकल चालवायला शिकलो आणि तेव्हापासून ती माझी सोबतीच झाली. शाळेत, मैदानावर कुठेही जाताना मी माझ्या सायकलशिवाय जाऊच शकत नाही, इतकं माझं तिच्याशी घट्ट नातं जुळलं आहे. आजी आजोबांचे प्रेम, मित्रांसोबत सायकलवरून केलेल्या सहली, धम्मालमस्ती अशा अनेक आठवणी या सायकलशी जोडल्या गेल्या आहेत, म्हणूनच मी जिव्हाळ्याने तिची काळजी घेतो, देखभालही करतो. अशी ही सायकल माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर हक्काची, जीवाभावाची व्यक्तीच झाली आहे.

COMPLETED


Marathi, ssc, 10th std, grammar, test, paper 2, Maharashtra, board,


 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here
 1. Click here

VISITORS COUNT

185600
Users Today : 949
Total Users : 185599
Views Today : 1748
Total views : 670382

Browse Categories

Archives