Q1.’अंकिला मी दास तुझा’ या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
a)माता धावून जाते ______.
माता धावून जाते बाळ आगीच्या तडाख्यात सापडताच माता धावून जाते.
b)धरणीवर पक्षिणी झेपावते ______.
धरणीवर पक्षिणी झेपावते आपली पिल्ले धरणीवर कोसळताच पक्षिणी पृथ्वीवर झेपावते.
c)गाय हंबरत धावते ______.
गाय हंबरत धावते भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय हंबरत धावते.
d)हरिणी चिंतित होत ______.
हरिणी चिंतित होत जंगलात वणवा लागताच हरिणी आपल्या पाडसाकरता चिंतित होते.
Q2.आकृती पूर्ण करा.
Q3.कोण ते लिहा.
a)परमेश्वराचे दास –
परमेश्वराचे दास – नामदेव महाराज
b)मेघाला विनवणी करणारा –
मेघाला विनवणी करणारा – चातक
Q4.खालील ओळींचे रसग्रहण करा.
a)‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं।।
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे।।’
‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.
आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच ती लगेच खाली झेप घेते. भुकेले वासरू जेव्हा हंबरू लागते तेव्हा गायही सारे काही सोडून हंबरत आपल्या पिल्लाकडे धाव घेते.
अशाप्रकारे, संतकवी नामदेव परमेश्वर व स्वत:च्या नात्यातील प्रेमभाव पक्षीण व तिची पिल्ले, गाय व तिचे वासरू या उदाहरणांद्वारे स्पष्ट करत आहेत.
b)आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.
आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून आपल्या मुलाला संकटात पाहून कोणतीही आई कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळाकडे धाव घेते, त्याला त्या संकटातून बाहेर काढते. आगीच्या जवळ जाणाऱ्या किंवा आगीच्या तडाख्यात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची माऊली धाव घेते. पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच त्यांच्या चिंतेने ती लगेच खाली झेप घेते.
भुकेले वासरू जेव्हा गायीच्या दुधासाठी हंबरू लागते, तेव्हा ती गायही सारे काही सोडून आपल्या पिल्लाकडे हंबरत धाव घेते. वनात फिरणाऱ्या हरिणीला वणवा लागल्याचे कळताच ती पाडसाच्या चिंतेने व्याकुळ, कावरीबावरी होते, आपल्या पिल्लाजवळ धाव घेते. अशाप्रकारे, संतकवी नामदेवांनी या अभंगातून आई, पक्षीण, गाय, हरिणी या मातांच्या ममतेचे, कनवाळू वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे.
c)संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, वासरू-गाय, हरिणी-तिचे पाडस, चातक-मेघ अशा विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना व्यक्त केली आहे.
संत नामदेवांना विठ्ठल दर्शनाची, त्याच्या प्रेमप्रसादाची ओढ लागली आहे. परमेश्वराच्या प्राप्तीकरता त्यांचे मन व्याकुळ झाले आहे. या अभंगातून ते विठ्ठलभेटीची आपली तीव्र इच्छा व्यक्त करताना म्हणतात, ज्याप्रमाणे बाळ आगीच्या तावडीत सापडू नये, काही वाईट घडू नये, यासाठी बाळाच्या काळजीने आई धावत त्याच्यापाशी जाते, तसा भगवंता तू, माझ्यासाठी धावून येतोस. तुझ्या या प्रेमाने तू मला तुझा दास (सेवक) केले आहेस, मी तुला शरण आलो आहे.
पिल्ले जमिनीवर पडताच आकाशात विहार करणारी पक्षीण लगेच त्यांच्याजवळ झेप घेते, भुकेल्या वासराच्या ओढीने गायही दूध पाजण्यासाठी हंबरत त्याच्याजवळ धाव घेते. रानात वणवा लागल्याचे समजताच हरिणी आपल्या पाडसाच्या काळजीने व्याकुळ होते, तीही आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी त्यांच्याजवळ धावत जाते.
पावसाच्या थेंबांची वाट पाहणारा चातक ज्या आतुरतेने ढगांना पाऊस पाडण्याची विनंती करतो, त्याच आतुरतेने हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे. अशाप्रकारे, संत नामदेव विविध उदाहरणांद्वारे परमेश्वराजवळ त्याच्या भेटीची, दर्शनाची विनवणी करत आहेत.
d)पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
आमच्याकडे ‘स्वीटी’ नावाची पाळीव कुत्री आहे. तिने एका छोट्या, गोंडस पिल्लाला जन्म दिला. आम्ही त्याचे नाव ‘टॉमी’ ठेवले. टॉमी हळूहळू लहानाचा मोठा होत होता. तो आनंदाने इतरांच्याही घरात खेळत असे.
एकदा शेजारच्या सुधाकाकूंच्या मनीचे व त्याचे मोठे भांडण झाले. दोघेही झुंजू लागले. मनीने छोट्या टॉमीला पार हैराण करून सोडले. दुरून येणाऱ्या स्वीटीने ते पाहिले आणि ती मनीवर धावून गेली. तिच्यावर भुंकू लागली. जणू काही ती मनीला धावून विचारत असावी ‘माझ्या मुलाला का बरे मारतेस?’ बराच वेळ मनीवर राग व्यक्त करत, आपल्या पिल्लाविषयीची माया दाखवत तिने मनीला चांगलेच झाडले.
मनी निघून गेल्यावर तिने टॉमीला हलकेच चावले आणि ती त्याला मार लागलेल्या ठिकाणी चाटू लागली. टॉमीही आपल्या आईच्या कुशीत शांतपणे निजला. हा प्रसंग अनुभवताना, प्रत्यक्ष पाहताना मला प्राण्यांतील आई-मुलाच्या प्रेमाचे, ममतेचे दर्शन घडले.
completed