1. Home
  2. /
  3. Blog
  4. /
  5. Maharashtra Board
  6. /
  7. 10th Standard
  8. /
  9. Marathi
  10. /
  11. Chapter 6: दोन दिवस.

Chapter 6: दोन दिवस.

25 Jun 2021 5:46 am

Q1.कृती पूर्ण करा.

(a)‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.

SOLUTION

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

(b)कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.

SOLUTION

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो.


Q2.एका शब्दांत उत्तर लिहा.

(a)कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट- 

SOLUTION

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट- कवीचे हात

(b)कवीचा जवळचा मित्र- 

SOLUTION

कवीचा जवळचा मित्र- अश्रू


Q3.खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

(a)माना उंचावलेले हात

SOLUTION

कवीचे सर्वस्व असलेले हात नेहमी कष्ट उपसण्यात व्यस्त होते. याच हातांनी कधी त्यांना पोटापाण्यासाठी काम मिळवून दिले, तर कधी नवनिर्मिती करून मान-सन्मान मिळवून दिला.

(b)कलम केलेले हात

SOLUTION

कलम करणे म्हणजे छाटणे, घाव घालून तोडणे. प्रस्तुत शब्दसमूहातून कवीच्या हातांना नवनिर्मिती करण्यापासून रोखले गेले किंवा त्यांच्या नवनिर्मितीची, काव्यप्रतिभेची, सृजनशक्तीची कोंडी झाली, त्यांच्या हातांना उपेक्षा सहन करावी लागली असा अर्थ व्यक्त होतो.

(c)दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात

SOLUTION

कवीचे नवनिर्मितीक्षम, सृजनशील हात जे त्याच्यासाठी सर्वस्व आहेत, ते नवनिर्माणाची शक्ती, काव्यप्रतिभा असूनही रोजची भूक भागवण्यासाठी खस्ता खाण्यात, कष्ट उपसण्यातच व्यस्त होते.


Q4.खालील ओळींचे रसग्रहण करा.

(a)‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’

SOLUTION

‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते.

कष्टकऱ्याचे संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दु:ख, दारिद्र्याशी झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसादिवसांनी सरत गेले, तरीही त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते. असे तापदायक आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते.

(b)’दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

SOLUTION

‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते. नेहमी जगाच्या सुखाचा विचार करणारा हा कष्टकरी या जगातच रममाण होऊन जगतो. दारिद्र्याचे चटके सहन करत, सतत येणाऱ्या अडचणी, दु:खे पेलून, त्यावर मात करून तो आपले जीवन जगतच राहतो. हे सर्व सहन करण्याची, संकटांवर, दु:खावर मात करण्याची शिकवण जगाच्या शाळेत त्याला मिळते. त्यामुळे, तो कधीही दु:खाचा बाऊ करत नाही किंवा निराशेने खचून जात नाही. आपणही त्याच्याप्रमाणे जीवनात येणाऱ्या दु:खातून, अडचणींतून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी विचार वरील ओळींतून लक्षात येतो.

(c)कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

SOLUTION

कवी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्याना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात. हे कष्ट उपसण्याच्या नादात, त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याचा, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो.त्याला रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. गरिबी कायम सोबतीला असते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टमय जीवनाला अश्रूंची सोबत असते. दु:ख पचवण्याचे, त्यावर मात करून पुढे जात राहण्याचे बळ गोळा करावे लागते.

झोतभट्टीतील पोलाद ज्याप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडते त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नाना तऱ्हेच्या संकटांनी, दु:खांनी होरपळून निघत असते, तरीही हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो. या दु:खांत होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते. दु:खांचा, परिस्थितीचा बाऊ न करता, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो. अशाप्रकारे, कष्टाशी, दु:खांशी झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते.

(d)’कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

SOLUTION

नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करताना ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’, या शब्दांत कवीने भीषण जीवनसत्य मांडले आहे.

रोजची भूक भागवण्यासाठीही जिथे अपार कष्ट करावे लागतात, या पोटामागे संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते अशा कष्टकऱ्यांचे जीवन खूपदा सुखाची वाट पाहण्यात वाया जाते किंवा दु:खांशी झुंज देण्यात, अडचणींचा सामना करण्यातच निघून जाते. त्यांचे आयुष्य रणरणत्या उन्हाळ्याचे असते. पोटाची आग शांत करण्यासाठी त्यांना भाकरीच्या चंद्राची वाट पाहावी लागते, तिचा शोध घ्यावा लागतो. अशा कष्टकर्यांच्या जीवनातील व्यथा, वेदना मांडून कवीने जीवनसत्याचे दर्शन घडवले आहे. दु:खमय परिस्थितीतही सकारात्मक विचार करत आयुष्य जगणाऱ्या कामगाराचे चित्रण यात घडते.

completed


VISITORS COUNT

403162
Users Today : 29
Total Users : 403161
Views Today : 147
Total views : 1414254

Browse Categories

Archives