17 Jun 2021 4:43 pm
Q1.खालील वाक्य पूर्ण करा.
1.अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी- ______.
अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी- चकोर.
2.पिलांना सुरक्षितता देणार- _______.
पिलांना सुरक्षितता देणार- पक्षिणीचे पंख.
3.स्वत:ला मिळणारा आनंद- _______.
स्वत:ला मिळणारा आनंद- स्वानंद.
4)व्यक्तीला सदैव सुख देणारा- _______.
व्यक्तीला सदैव सुख देणारा- योगीपुरुष.
Q2.खालील आकृती पूर्ण करा.
Q3.खालील तक्ता पूर्ण करा.
योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.
योगीपुरुष | जीवन (पाणी) |
योगीपुरुष | जीवन (पाणी) |
१. योगीपुरुष त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करतो. | १. पाणी फक्त बाह्यांग निर्मळ करते. |
२. योगीपुरुष स्वानंदतृप्तीचा अनुभव करून देतो. त्याच्या सहवासात आल्यानंतर मिळणारे सुख सर्वकाळ टिकून राहते. | २. पाणी प्यायल्यानंतर मिळणारे सुख क्षणिक असते. ते मर्यादित काळच टिकून राहते. |
३. योगीपुरुषाचा सहवास सर्व इंद्रियांना संतुष्ट करणारा, शांतवणारा आहे. | ३. पाण्याचा गोडवा फक्त जिभेपुरता मर्यादित असतो. |
Q4.खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. (योगी सर्वकाळ सुखदाता)
1.जीभ –
जीभ – रसना
2.पाणी-
पाणी- उदक, जल, जीवन
3.गोडपणा-
गोडपणा- मधुरता
4.ढग-
ढग- मेघ
Q5.खालील ओळींचे रसग्रहण करा.
1.तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।
‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना केली असून योगीपुरुषाचे गुण हे पाण्याच्या गुणांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
पाणी हे ढगांतून खाली पडते; मात्र त्यामुळे सर्व लोक सुखावतात कारण त्या पाण्यामुळे शेती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याप्रमाणेच योगीपुरुषाचे इहलोकात (पृथ्वीलोकात) जन्म घेणे हे लोकांना श्रवणकीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठीच असते असा अर्थ वरील काव्यपंक्तींतून स्पष्ट केला आहे.
2.‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरता पाणी हेच जीवन असते. प्रत्येक गोष्टीकरता त्यांना पाण्याची गरज भासते; मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो.
तहान भागवणाऱ्या पाण्याचा गोडवा जिभेलाच सुखावतो; परंतु आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारा योगीपुरुष आपल्या वाणीने, आपल्या उपदेशाने आपल्या इंद्रियांना संतुष्ट करतो. ढगातून पडणाऱ्या पावसामुळे शेतीभाती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याचप्रमाणे योगीपुरुषाच्या येण्याने सर्वसामान्यांना आत्मानुभूती होऊन त्यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे, संतकवी एकनाथ योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात.
3.योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.
पाणी हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी आपले बाह्यांग स्वच्छ करते, योगीपुरुषाच्या सहवासाने मात्र आपण अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ होतो. आपला सबाह्य विकास घडतो.
पाणी तहानलेल्याची तहान भागवते, त्याच्या जिभेला सुखवते, तर योगीपुरुष लोकांना आत्मानंद, स्वानंद मिळवून देतो. चिरकाल टिकणार्या, कधीही न संपणाऱ्या या आनंदाचा अनुभव योगीपुरुष सामान्य जीवांना मिळवून देतो.
पाणी पावसाच्या रूपाने आकाशातील ढगांतून खाली येते. त्यामुळे, शेते पिकवून पृथ्वीवरील जीवांना अन्नधान्य मिळते. त्याचप्रमाणे योगीपुरुष या इहलोकात जन्म घेऊन येथील लोकांचा उद्धार करतो.
अशाप्रकारे, पाणी व योगीपुरुष आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जगाचे कल्याण करतात, इतरांच्या उपयोगी पडतात. त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्यालाच वाहिलेले असते.
COMPLETED